गोमंतकातील प्रमुख सणापैकी शिमगोत्सव हा एक महत्वाचा सण. काणकोण महालात हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.
श्रीमोहिनी देवीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सादोळशे गावाचा हा प्रमुख उत्सव .फाल्गुन शुक्ल नवमीला देवळासमोरील मांडावर गावकरी एकत्र जमतात .
मांडावर नारळ ठेऊन देवाची प्रार्थना करतात. आणि मेळ नाचायला सुरुवात करतात.
पाच दिवस घरासमोरील अंगणात घुमटाच्या तालावर धुंद होऊन नाचणारे मेळ हे या उत्सवाचे वेगळेपण .
दररोज रात्री देवालयाच्या सभामंडपात हरिदास ( गणपती शारदा ) व नंतर नाटक
चतुर्दशीच्या दुपारी समराधना. रात्री सुवारीवादन . घुमट व सामेळाच्या तालावर धुंद होऊन नाचायचे .
' शेंवते झाडाच्यो लांब ताळयो , लांब ताळयो शेवंते फुल्यो कळयो '
पौर्णिमेच्या रात्री होलिकादहन व मांड मोडणी . त्यानंतर कलावंतांचो नाच . आणि हुदा ( दिवटी नृत्य )
असा हा शिमगोत्सव . मुलींना माहेरी बोलावणारा . गावच्या लोकांना एकत्र आणणारा . पांच दिवस धुन्द करणारा. आठवणीत आठवणीत राहणारा.