शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

४. साहित्य सेवा

५ .
भारतीय कुटुंब संस्था

     तुला ठाऊक आहे का ! पर्यावरणाची चिंता करणारी २५ % अमेरिकी माणसे आज दहनसंस्कार करतात .  ३३% माणसे भारतीय अध्यात्म परंपरेचा अवलंब करताना दिसतात . योग , ध्यान , शाकाहार त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे . आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांच्या संगोपनाकडे ते जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागले आहेत . सहकुटुंब , सहपरिवार फिरायला लागले आहेत . ' मित्राने बोलणे संपविले .
     ' भारतीय कुटुंब संस्था ' हे मा . कृष्णप्पाजींचे पुस्तक वाचले .  मन अंतर्मुख झाले . भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला . आर्थिक स्थितीत बदल होत  मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्ग बनला . समाजातील स्तर आर्थिक दृष्टीने एक पायरी वर सरकले . पैसा आला आणि येताना बरोबर कुरीतींच्या छायाही घेऊन आला . पशुता , लुबाडणूक ,  बलात्कार , क्रूरता , विघटन , स्वार्थ समाजाला ग्रासू  पाहू लागला .
     समाजातील या समस्यांवर विचार करताना , छोटे छोटे उपाय करताना मा . कृष्णाप्पाजींना जो मार्ग दिसला , जी दिशा गवसली तिचे दिशादिग्दर्शन करणारे हे त्यांचे पुस्तक आहे . मुलाला वेळ देऊ शकत नाही म्हणून भरपूर पोकेट मनी देणे आणि तो व्यसनी झाल्यावर गळा काढणे , मुलगी शिकावी म्हणून स्वयंपाकाला हात लावू न देणे आणि लग्न झाल्यावर चहाही करता न आल्यावर डोक्याला हात लावून बसणे , अति लाडाने शेफारून ठेवणे आणि घटस्फोट झाल्यावर विमनस्क होणे , अपघातात माणूस जाणे आणि कुटुंबाची वाताहत होणे . किती समस्या सांगाव्या !
     समाजाच्या विद्यमान स्थितीवर टीका सगळेच जण करतात . ती बदलण्याचा मार्ग मात्र कोणीच दाखवत नाहीत अशी स्थिती आज आहे .  भारतीय कुटुंब संस्था ' या पुस्तकात  मा . कृष्णप्पाजींनी मात्र असे आश्वासक समाज स्वरूप दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे . कुटुंब हा आपल्या समाजाचा अभेद्य किल्ला आहे . संस्कार हे त्याचे मजबूत शिलाखंड आहेत . आणि परस्परांमधले ममत्व हे त्यातील सिमेंट आहे .
     मुले हि आपली खरी संपत्ती आहे . त्यांना भरपूर वेळ द्या . दिवसातून एकदा एकत्र जेवा . मुलांना आपले आपल्या हाताने वाढा .  नातेवाईकांना भारतीय नावांनी हाक मारा . गृहोपयोगी वस्तू कमीत कमी वापरा . शक्य तोवर काटकसर करा . पाहते लवकर उठा . देवावर श्रद्धा ठेवा . भरपूर दानधर्म करा . अतिथी आपला देव आहे . भितींवर चांगली  देवतांची चित्रे लावा . स्वभाषा , स्वदेशी व स्वभूषा हे सूत्र पाळा .
     श्री . भाऊराव क्षीरसागर अनुवादित या पुस्तकाला मा . सुरेश सदाशिव उपाख्य भय्याजी जोशी यांची  प्रस्तावना लाभली आहे . सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक समाज हितेच्छुने, विशेषतः संघटक लोकांनी हे पुस्तक मुद्दाम वाचले पाहिजे . आपल्या कार्यक्रमात यातील उपक्रमांची जोड दिली पाहिजे .  भारतीय कुटुंबासाठी तर हि आधुनिक गीता ठरावी . साखरपुडा , विवाह , विवाह वर्धापनदिन , वाढदिवस या दिवशी सप्रेम भेट द्यावे असे हे पुस्तक संग्राह्य असेच आहे .
 
पुस्तकाचे नाव :- भारतीय कुटुंब संस्था
लेखक :- मा . कृष्णाप्पा
पृष्ठ :- १०४
प्रकाशक :- भारतीय विचार साधना, पुणे
किमत :- १००  रुपये

मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

४ .
छत्रपती शिवाजी आणि स्वराज्य
      छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर राजे , धुरंधर राजकारणी पुरुष . राज्यकारभार कसा करावा हे सांगणाऱ्या या राजाने समाजात प्रामाणिकपणा, शील, सद्गुणसंपन्नता, निःस्वार्थ ध्येयनिष्ठा, साहस, कौशल्य, धैर्य, सावधानपणा या गुणांची निर्मिती केली .  स्वभाषा, नाणी, मंत्री परिषद, जहाज, छपाई, शस्त्रास्त्र, रस्ते, गड, हेर विभाग, महिला सन्मान, कृषी, कुटुंब, पाणी, वेतन, न्याय, धर्म सगळ्यांनाच आपला परिसस्पर्श त्यांनी दिला .
     राजा मृत्यू पावताच पळून जाणाऱ्या समाजाला त्यांनी स्वराज्यासाठी लढायला शिकविले . परिणामी जगातील सर्वात क्रूर धर्मांध औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर  राजा नसलेल्या जनतेने त्याला २५ वर्षे झुंजवून झुंजवून तिथेच गाडून टाकले .
     अशा राजांचे ' गवर्नन्स '  दाखविणाऱ्या त्यांच्याच २२ पत्राचे उत्कृष्ठ  संपादन खासदार  श्री . अनिल दवे यांनी  केले आहे . साप्ता. विवेकाने प्रकाशित केकेल्या या २३१ पानी पुस्तकाची किंमत ५०० असून सध्या ते ४०० रुपये सवलतीत उपलब्ध आहे . श्री.नरेंद्र मोदींची प्रस्तावना, बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद, रंगीत छायाचित्रे आणि सुंदर बांधणी असलेले हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे .
मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

३ .
डॉक्टर हेडगेवार
हे वर्ष संघसंस्थापक प. पू. डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे . संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व. नाना पालकर यांनी डॉक्टर हेडगेवार यांचे संपूर्ण चरित्र लिहिले आहे. या पुस्तकाची आठवी आवृत्ती विजयदशमी , ३ ऑक्टोबर २०१४ रोजी भारतीय विचार साधना द्वारा  प्रकाशित झाली आहे. आवर्जुन संग्रही ठेवावे असे हे युगप्रवर्तक चरित्र आहे . 
पुस्तकाचे नाव :- डॉ . हेडगेवार
लेखक :- नाना पालकर
पृष्ठ :- ५१२
प्रकाशक :- भारतीय विचार साधना
किमत :- 300  रुपये
मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

२ .
छत्रपती शिवाजी आणि स्वराज्य
      छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर राजे , धुरंधर राजकारणी पुरुष . राज्यकारभार कसा करावा हे सांगणाऱ्या या राजाने समाजात प्रामाणिकपणा, शील, सद्गुणसंपन्नता, निःस्वार्थ ध्येयनिष्ठा, साहस, कौशल्य, धैर्य, सावधानपणा या गुणांची निर्मिती केली .  स्वभाषा, नाणी, मंत्री परिषद, जहाज, छपाई, शस्त्रास्त्र, रस्ते, गड, हेर विभाग, महिला सन्मान, कृषी, कुटुंब, पाणी, वेतन, न्याय, धर्म सगळ्यांनाच आपला परिसस्पर्श त्यांनी दिला .
     राजा मृत्यू पावताच पळून जाणाऱ्या समाजाला त्यांनी स्वराज्यासाठी लढायला शिकविले . परिणामी जगातील सर्वात क्रूर धर्मांध औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर  राजा नसलेल्या जनतेने त्याला २५ वर्षे झुंजवून झुंजवून तिथेच गाडून टाकले .
     अशा राजांचे ' गवर्नन्स '  दाखविणाऱ्या त्यांच्याच २२ पत्राचे उत्कृष्ठ  संपादन खासदार  श्री . अनिल दवे यांनी  केले आहे . साप्ता. विवेकाने प्रकाशित केकेल्या या २३१ पानी पुस्तकाची किंमत ५०० असून सध्या ते ४०० रुपये सवलतीत उपलब्ध आहे . श्री.नरेंद्र मोदींची प्रस्तावना, बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद, रंगीत छायाचित्रे आणि सुंदर बांधणी असलेले हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे .
मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

१ .
पुस्तकाचे नाव :- लव जिहाद
लेखिका :- सौ . सुनीला सोवनी
किमत :- २५ रुपये
पृष्ठ :- ९६
प्रकाशक :- भारतीय विचार साधना
लव जिहाद मध्ये फसल्यानंतर हिंदू मुलीसमोरची स्थिती :- १. वेश्या व्यवसाय . २. मुस्लीम घरात मोलकरीण . ३. लव जिहाद प्रसारक . ४. मादक द्रव्याचे व्यसन, मनोरुग्ण . ५. दहशतवादी संघटनेत भरती . ६. अखाती देशात भोगदासी . 
गेल्या वर्षीची प्रकरणे : पाच हजार 
उठा ! जागे व्हा .! कृती करा ! 

मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा